
माळवाडगाव |वार्ताहर| Malvadgav
श्रीरामपूरच्या पूर्व गोदाकाठ परिसरातील गावांवर अगदी कमी उंचीवरून पंधरा वीस मिनिटे घिरट्या घालणारे विमान पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना काल सायंकाळी घडली.
शिर्डी (काकडी) साईबाबा विमानतळ सुरू झाल्यापासून राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील गावोगावच्या शेतातील, शेतकऱी, शेतमजूर आकाशात कमी उंचीवरून जाणारे विमान कुतुहलाने पाहतात मात्र काल शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीरामपूरच्या पूर्व गोदाकाठ परिसरातील गावांवर अगदी कमी उंचीवरून पंधरा वीस मिनिटे विमान घिरट्या घालत असल्याचे पाहून या भागातील ग्रामस्थांना आश्चर्य वाटले.
दक्षिण बाजूने अडबंगनाथ देवस्थान कमालपूर, भामाठाण गोदावरी पट्टयातून उत्तर बाजूने श्रीक्षेत्र सरालाबेट या कक्षेत पाचही घिरट्या (प्रदक्षणा) 5.15 ते 5.30 या वेळेत मारून पाचव्या फेरीस लँडिंग सिग्नल न मिळाल्याने अन् रात्रीची उतरण्याची सुविधा नसल्याने हैदराबाद - शिर्डी हे सायंकाळी 5.15 उतरणारे स्पाईस कंपनीचे 73 प्रवासी घेऊन येत असलेले विमान शिर्डी ऐवजी औरंगाबाद विमानतळावर गेले.