श्रीरामपुरात राष्ट्रीय युवा दिनीच लसीकरणावाचून युवकांना तीन तास ताटकळत बसावे लागले

वशिलेबाजी बंद करुन टोकनपध्दतीचा अवलंब करा; काँग्रेसची मागणी
श्रीरामपुरात राष्ट्रीय युवा दिनीच लसीकरणावाचून युवकांना तीन तास ताटकळत बसावे लागले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या टिळक वाचनालय येथे कोविड लसीकरण सुरू असून 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी 300 नागरिकांना कोव्हॅक्सीन लस उपलब्ध होती. त्या लससाठी 500 ते 700 युवक उपस्थित होते. लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. लस कमी असताना युवकांना तीन ते चार तास ताटकळत ठेवणे चुकीचे आहे. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून टोकन पध्दतीचा अवलंब करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.

नगरपालिका प्रशासनाने ज्या 300 नागरिकांना लसीकरणासाठी फोन केला होता. त्यातील 130 नागरिकच सुरुवातीच्या दीड तासात उपस्थित झालेले होते. तो स्लॉट फक्त सकाळी नऊ ते अकरा या दोन तासांसाठीचाच होता. यातच सुरुवातीच्या दीड तासात 300 नागरिकांपैकी 130 नागरिक उपस्थित होते. म्हणजेच फक्त 40 टक्के नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला.

लोकांमध्ये लसीकरणाबाबत भीती असेल, लसीकरणाबाबत काही गैरसमज असतील किंवा कोविडचा प्रभाव कमी झाला असे लोकांना वाटत असेल त्यामुळे नागरिक लस घेणे टाळताना दिसत आहेत. लसीकरणासाठी कमी लोक आल्याने नगरपालिकेच्या व ग्रामीण रुग्णालयाच्या प्रशासकांनी सोशल मीडियावर मेसेज टाकले की 18 ते 45 वयोगटातील ज्यांना कोव्हॅक्सीनचा पहिला डोस द्यायचा आहे त्यांनी यावे. अशा प्रकारचा मेसेज वाचून 500 ते 700 युवक लसीकरण घेण्यासाठी आले. आणि लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. हे युवक 3 ते 4 तासांपासून लसीकरणाच्या प्रतीक्षेत उभे होते.

नगरपालिकेने कमी डोस उपलब्ध असताना एवढ्या तरुणांना ताटकळत प्रतीक्षेत उभे ठेवणे चुकीचे आहे. त्यासाठी लसीकरणासाठी जेवढे डोस शिल्लक आहेत. तेवढ्याच लोकांना टोकन वाटावे व त्यांना वेळ सांगून त्याच वेळेला बोलवावे. म्हणजे गर्दी होणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल व त्यांना होणारा मनस्ताप टाळता येईल. त्यामुळे नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध लस व लसीकरणासाठी येणारे लोक यांचा विचार करून किती लोक लसीकरणासाठी दाद देतात हे बघून टोकन पद्धत राबवली पाहिजे. त्यामुळे लोकांमध्ये होणारी चिडचिड व मनस्ताप टाळता येईल, असेही श्री. ससाणे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com