श्रीरामपूर ते जेजुरी बस सेवा सुरु

श्रीरामपूर ते जेजुरी बस सेवा सुरु
बस सेवा (File Photo)

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर आगारातून (Shrirampur Bus Stand) श्रीरामपूर ते जेजुरी बस सेवा (Shrirampur to Jejuri Bus Service) सुरु करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली. ही बस श्रीरामपूरहून (Shrirampur) सकाळी 10.30 वाजता सुटते व जेजुरीहून (Jejuri) सकाळी 6 वाजता सुटते. सदर बससेवा संगमनेर (Sangamner), आळेफाटा (Alephata), स्वारगेट बस स्थानक (Swarget Bus Stand), सासवड (saswad) मार्गे जेजुरीला (Jejuri) जाईल.

तसेच सकाळी 8.30 वाजता संगमनेर (sangamner) मार्गे श्रीरामपूर (Shrirampur) ते पुणे (Pune), शिवाजीनगर (Shivajinagar) बस सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. परत शिवाजीनगर (Shivajinagar) बस स्थानकातून दुपारी 1.30 वाजता सुटणार आहे. या दोन बस सेवेमुळे संगमनेर (Sangamner), आळेफाटा (Alephata) पुणे (Pune) मार्गावर जाण्यासाठी मोठी सोय निर्माण होणार आहे. वाहतूक अधिक्षक किरण शिंदे, प्रितम बोरावके यांनी बस सेवेचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. या बस सेवेचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर फायदा घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेने केले आहे. त्याणुळे बसेस कायमस्वरुपी सुरु राहतील, असे स्पष्ट करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com