शिक्रापूरजवळ तीन मोटारसायकलच्या विचित्र अपघातात श्रीरामपूरच्या तरुणासह तिघे ठार

शिक्रापूरजवळ तीन मोटारसायकलच्या विचित्र अपघातात श्रीरामपूरच्या तरुणासह तिघे ठार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

नगर-पुणे रस्त्यावर शिक्रापूरजवळच असलेल्या मिल्टन कंपनीजवळच तीन मोटारसायकलच्या झालेल्या विचित्र अपघातात श्रीरामपूरच्या तरुणासह तिघेजण जागीच ठार झाले. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील डॉ. सचिन हापसे यांचे चिंरजीव राजवर्धन सचिन हापसे (वय 21) हा पुणे येथील बी आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान महाविद्यालयास सुट्टी असल्यामुळे राजवर्धन पुणे येथून श्रीरामपूरकडे मोटारसायकलवरुन येत असताना शिक्रापूरजवळच मिल्टन कंपनीजवळच भरघाव वेगात असलेले कारखाना कामगार अचानक मोटरसायकलवर आडवे घुसल्यामुळे भिषण अपघात झाला.

या दोन मोटारसायकलच्या झालेल्या धडकेत आणखी एक मोटारसायकल येवून धडकल्याने हा विचित्र अपघात झाला. या अपघातात राजवर्धन सचिन हापसे गंभीर जखमी झाला. त्याला पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर त्याचेवर श्रीरामपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीरामपूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन हापसे यांचा राजवर्धन एकुलता एक मुलगा तर अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे यांचा नातू होत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com