
श्रीरामपूर | प्रतिनिधी
अल्पवयीन विद्यार्थीनीला शाळेतून पळवून नेत तिचे जबरदस्तीने धर्मांतर करून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला व बळजबरीने निकाह केल्याप्रकरणातील मुलीवर सध्या तिच्यावर नगर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून न्यायालयाच्या आदेशानंतर अहमदनगर येथील स्नेहालयात नेणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी दिली.
शाळेतून तीन वर्षापूर्वी अपहरण केले व धर्मपरिवर्तन करून तिच्यासोबत निकाह केला. तसेच इमरान कुरेशी याने तीन वर्षे जबरदस्तीने शरीरसंबंध केल्यामुळे ही अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती झाली असून पोलिसांनी तिस न्यायालयाच्या आदेशानंतर तीस उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार केल्यानंतर तीस नगर येथील स्नेहालयात ठेवणार असण्याची शक्यता आहे.
याप्रकरणातील आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर यास पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 27 जुलैपर्यंत म्हणजे 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
याअगोदरही या आरोपीने 11 ते 16 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींना फुस लावून पळवून नेवून अत्याचार केल्या असून त्या प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत. या प्रकरणातील आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्याविरुध्द श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आतापर्यंत सात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दिली.