श्रीरामपूरच्या शिक्षकांचा नगरमध्ये गौरव

रोटरीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड प्रदान
श्रीरामपूरच्या शिक्षकांचा नगरमध्ये गौरव

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील विविध शाळांमध्ये कार्य करणार्‍या मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाचा रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रलतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड देऊन गौरव करण्यात आला.

नगर येथील पे्रमराज सारडा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारडा कॉलेजचे चेअरमन अजित बोरा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, सुनील रामदासी, अशोक उपाध्ये, राजू गुजर, क्रॉम्प्टनचे मॅनेजर प्रशांत महाजन, रोटेरियन अभय राजे, सचिव ईश्वर बोरा आदी उपस्थित होते.

यावेळी श्रीरामपुरातील सलीमखान पठाण (मुख्याध्यापक, नगरपालिका शाळा क्रमांक पाच), सुभाष गोरे (मुख्याध्यापक, श्रीरामपूर एज्यु. सोसा. प्राथमिक शाळा) बी. एस. कांबळे (मुख्याध्यापक, दादा जोशी नवीन मराठी शाळा), चेतनकुमार वाजे (उपशिक्षक, भि.रा. खटोड कन्या विद्यालय), आस्मा अब्दुल रजाक पटेल (उपशिक्षिका, शाळा क्रमांक 5) सचिन मुळे (उपशिक्षक, दादा जोशी नवीन मराठी शाळा) शेख नाजिया अब्दुल रहमान (प्र. मुख्याध्यापिका, नगरपालिका शाळा क्रमांक 9) दत्तात्रय कांबळे (मुख्याध्यापक बा .ग . कल्याणकर नाईट हायस्कूल), अभिजीत सराफ (उपशिक्षक, शा.ज . पाटणी विद्यालय), प्रा. सतीश म्हसे ( भि रा खटोड ज्यु. कॉलेज ), बाबा वाघ (उपशिक्षक, क . जे . सोमय्या हायस्कूल) व शशिकला विनायक सराफ (उपशिक्षिका, न.पा.शाळा क्रमांक एक) यांचा नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड या पुरस्काराने प्रमाणपत्र व शाल देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास जिल्हाभरातील विविध जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.

यावेळी सुनील रामदासी, संजय जोशी, अभय राजे, अजित बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश परदेशी यांनी केले. आभार ईश्वर बोरा यांनी मानले .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com