श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटला

श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटला

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर येथील रेल्वे भुयारी पुलाजवळ टँकरचा अ‍ॅक्सल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. सदरचे वाहन क्र एम एच 43 यु 2296 असुन यावेळी वाहन चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावरील ताबा सुव्यवस्थीत ठेवला.

यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु दुर्घटना अगदी बोगद्याच्या तोंडाजवळ असल्याने वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी निर्माण झाली होती. यावेळी महाविद्यालयीन शालेय विद्यार्थी तहसील कार्यालय तसेच विविध प्रकारची शासकीय कार्यालय न्यायालय आदी ठिकाणच्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

घटनेची माहिती नागरिकांमधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी देण्यात आली. यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शफिक शेख यांनी घटना स्थळी भेट देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सचिन गायकवाड, सादिक शेख, दत्तात्रेय सातकर, तसेच गृहरक्षक दलाचे महेश थोरात, राहुल जाधव, रेवननाथ पेठे, नारायण चोरमले, हारी कदम, राजेन्द्र देसाई यांनी चोख बंदोबस्त बजावले.

यावेळी नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या. मळीचे टँकर वाहतुकीसाठी बाहेरच्या मार्गाने घेऊन जाणे आवश्यक आहे. परंतु शहरांमधूनच मळीची वाहतूक होत असल्याने परिसरातील नागरिकांनी याबाबत संबधित विभागाने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. साधारण 2 ते 3 तास वाहतुकीची कोंडी झाली असुन पोलीस प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com