श्रीरामपुर : वांगी खुर्द व कमालपूर ग्रामपंचायत बिनविरोध

सरपंचपदासाठी माळेवाडी, उंबरगाव, खंडाळा सरळसरळ लढत
श्रीरामपुर : वांगी खुर्द व कमालपूर ग्रामपंचायत बिनविरोध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील वांगी खुर्द व कमालपूर या दोन ग्रामपंचायतीत सदस्यासह सरपंचपद बिनविरोध झाले. आहेत. आता चार ग्रामपंचायतीच्या चार सरपंचपदासाठी 9 उमेदवारी अर्ज शिल्लक असून 40 सदस्यपदासाठी 80 उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. बिनविरोध झालेल्या कमालपूर व वांगी खुर्द या दोन्ही बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीवर मुरकुटे व ससाणे-मुरकुटे गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक, वांगी खुर्द, कमालपूर, उंबरगाव, माळेवाडी, खंडाळा या सहा ग्रामंचायतीच्या निवडणुकीसाठी 54 सदस्यपदासाठी 163 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर सहा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या 6 जागासाठी 38 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छाननीत सदस्यपदासाठी सर्व अर्ज वैध ठरले होते तर सरपंचपदासाठी 1 अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे राहिलेल्या सदस्यपदासाठी 163 व सरपंचपदासाठी 37 उमेदवारी अर्जात काल माघारीच्या शेवटच्या दिवशी 69 सदस्यपदासाठीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे राहिलेल्या 94 उमेदवारी अर्जापैकी तसेच वांगी खुर्द व कमालपूर ग्रामपंचायतीचे प्रत्येकी 7-7 सदस्यपासाठी 14 उमेदवार अर्ज शिल्लक राहिल्याने 14 सदस्य बिनविरोध झाले आहेत. वांगी बुद्रुक, माळेवाडी, उंबरगाव व खंडाळा या ठिकाणी 40 सदस्यपदासाठी 80 उमेदवार एकमेकासमोर निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. सरपंचपदासाठी 37 अर्जापैकी 26 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 11 उमेदवारी अर्ज शिल्लक होते. त्यापैकी कमालपूर व वांगी खुर्दचे एक-एकच अर्ज शिल्लक राहिल्याने तेथील सरपचपदही बिनविरोध झाले.त्यामुळे चार सरपंचपदासाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात लढत देणार आहेत.

वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी 7 जागासाठी 14 उमेदवारी शिल्लक राहिल्याने एकास एक अशी लढत होणार आहे. तर सरपंचपदासाठी तीन उमेदवारी अर्ज राहिले आहेत. माळेवाडी ग्रामपंचायतीत 9 सदस्यपदासाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर सरपंचपदासाठी दोन जण समोरासमोर लढत देणार आहेत. उंबरगाव ग्रामपंचायतीतही सरपंचपदासाठी दोन जण समोरासमोर लढत देणार आहेत तर 9 सदस्यपदासाठी 17 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर सर्वात मोठी समजली जाणारी खंडाळा ग्रामपंचायतीतही सरपंचपदासाठी दोनच अर्ज शिल्लक राहिले असल्याने ही लढत चांगलीच ठरणार आहेत. तर 15 सदस्यपदासाठीही केवळ 30 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले असल्याने सदस्यपदासाठी एकास एक लढत राहणार आहेत.

खंडाळा- सरपंचपद (अनु. जमाती स्त्री)- राधा संजय माळी, छाया लक्ष्मण बर्डे.

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 - रावसाहेब विश्नाथअभंग (अनु. जाती), सोपान रामभाऊ अभंग (अनु. जाती), अमोल भास्कर ढोकचौळे, अजय दत्तात्रय ढोकचौळे , मनिषा योगेश सोडणार (महिला) गायत्री प्रशांत सोडणार (महिला). प्रभाग-2-अनिल रामकृष्ण ढोकचौळे, अमोल राधाकृष्ण बोरकर, भिका चिमा खरात (अनु. जाती), ताराचंद दयानंत आलगुंडे (अनु. जाती), सुमन गोपीनाथ पवार (अनु. जमाती स्त्री), लहानबाई गोरख रजपूत (अनु. जमाती स्त्री). प्रभाग-3-प्रताप माधवराव ढोकचौळे , प्रभाकर धनराज साबदे, वंदना भिमराज विधावे (अनु.जाती स्त्री), सोनाली रविंद्र विधावे (अनु. जाती. स्त्री), जयश्री गणेश म्हसे (महिला), मंजुषा महेश ढोकचौळे (महिला). प्रभाग-4-सुभाष हरि पवार, अशोक शिवाजी पवार, वंदना भिमराज विधावे (अनु. जाती स्त्री), भारती राहुल वाघमारे (अनु. जाती स्त्री), रंजना आप्पासाहेब पवार (महिला), अनिता संतोष मोरे (महिला). प्रभाग-5-वृषाली किसन सोनवणे (अनु. जात स्त्री) ज्योती गोरख पवार (अनु. जाती स्त्री), संगीता विजय ढोकचौळे (ना. मा. प्र. स्त्री), संगिता विजय सदाफळ (ना. मा. प्र. स्त्री), दिनकर जगन्नाथ सदाफळ, राम नवनाथ ढोकचौळे.

उंबरगाव

सरपंचपदासाठी- अर्चना सचिन काळे व सुप्रिया विराज भोसले

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 -जगन्नाथ शंकर गांगुर्डे (अनु. जमाती), सवित्रा आबासाहेब राऊत (अनु. जमाती), नंदकिशोर सोपान काळे, भाऊसाहेब गोविंद भोकरे, वनिता किशोर कांडेकर, (महिला), जयाबाई पांडुरंग डोळसे (महिला). प्रभाग-2-राजेंद्र गुंडीबा ओहोळ (अनु. जाती), बापूराव धोंडीरामशेलार (अनु. जाती), अमृता सुरेश बर्डे (अनु. जमाती स्त्री), स्वाती चिमाजी राऊत, राजश्री बाळसाहेब कोळसे (महिला), वृषाली सचिन डोळसे (महिला). प्रभाग-3-प्रकाश गिताराम वारुळे, सुधीर जालिंदर वारुळे, रेखा प्रकाश आढाव (महिला), संगीता सुर्यकांत कोळसे (महिला), मंगल अशोक काळे (महिला).

वांगी बुद्रुक सरपंचपद (सर्वसाधारण)- ज्ञानेश्वर आसाराम बिडगर, आप्पासाहेब बबन माने, प्रविण सुनील मोरे

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 -बबन यशवंत आहेर (अनु. जमाती), गोरक्षनाथ लक्ष्मण बर्डे (अनु. जमाती), स्वप्नील दत्तात्रय खेमनर, गंगुबाई बाबासाहेब माने. प्रभाग-2-पोपट कारभारी कांबळे (अनु. जाती), योगेश मच्छिंद्र कांबळे (अनु. जाती) कांताबाई भाऊसाहेब पवार (अनु. जमाती स्त्री), यमुना बबन आहेर (अनु. जमाती स्त्री), रंजना दामोधर कोपनर (महिला), मंगल बाळासाहेब नरोटे (महिला). प्रभाग-3-अनिता मच्छिंद्र बर्डे ( अनु. जमात स्त्री), मुक्ताबाई गोपीनथ निकम (अनु. जमाती स्त्रे), कांताबाई बाबासाहेब हळनोर (महिला), प्रभावती ज्ञानेश्वर लकडे (महिला).

बिनविरोध ग्रामपंचायत कमालपूर

सरपंच- स्वाती सचिन मुरकुटे (ना. मा. प्र. स्त्री)

सदस्य- प्रभाग-1- उषा विनायक करपे (महिला), सुवर्णा सुनील गोरे (ना. मा. प्र. स्त्री), राहुल दत्तात्रय बारस्कर, प्रभाग-2 नंदू लक्ष्मण शिरसाठ (अनु. जाती), जिजाबाई बाळासाहेब जाधव (अनु. जमाती स्त्री), प्रभाग-3-किरण आप्पासाहेब गोरे, ललिता बाळासाहेब गोरे (महिला).

बिनविरोध ग्रामपंचायत वांगी खुर्द

सरपंच- संगिता राजू कांबळे (अनु.जाती स्त्री)सदस्य- प्रभाग-1- अनिता ज्ञानेश्वर गायकवाड, चारुशिला विष्णूदास जगताप (महिला), सुभाष खंडू मोरे (अनु. जमाती), प्रभाग-2 अनिल मोहन कोपनर (ना. मा. प्रवर्ग), मिनाक्षी विजय पडळकर (महिला), प्रभाग-3- सचिन भगत राऊत (सर्वसाधारण), विमल गेणुदास मोरे, (अनु. जमाती स्त्री).

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com