श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 729 जनावरांना लम्पीची बाधा

458 जनावरे बरी झाली; 40 जनावरांचा मृत्यू तर 231 जनावरांवर उपचार सुरू

संगहीत चित्र
संगहीत चित्र

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात 729 जनावरांना आतापर्यंत लम्पी रोगाची बाधा झाली असून पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर या रोगाचा सामना करीत लसीकरण व उपचार करून 458 जनावरे बरी केली असली तरी 40 जनावरांचा मृत्यू झाला असून 231 जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. विजय धिमते यांनी दिली.

तालुक्यातील तेरा गावांमध्ये लम्पी रोगाची बाधा झालेली आहे. ज्या भागात अशी जनावरे आढळले आहेत त्या भागाच्या पाच किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाने लसीकरण पूर्ण केलेले आहे. तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे 4 हजार 132, टाकळीभान-5 हजार 290, एकलहरे 4 हजार 570, खानापूर-3 हजार, उंबरगाव 4 हजार 400, दिघी-3 हजार 573, भैरवनाथनगर-7 हजार 834, वांगी खुर्द 6 हजार 500, भेर्डापूर 3 हजार 900, वडाळा 5 हजार, नायगाव 7 हजार 54, मातापूर 5 हजार 100, कमालपूर 1 हजार 900 असे एकूण 62 हजार 253 लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात सर्वाधिक लसीकरण नायगाव व भैरवनाथनगर या दोन गावांत पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी लसीकरण हे कमालपूर या गावात झाले आहे.

तर बेलापूर खुर्द येथे 39 जनावरे बाधित तर 5 मृत, टाकळीभान-96 बाधित तर 4 मृत, एकलहरे 13 बाधित व 1 मृत, खानापूर 75 बाधित तर 8 मृत, उंबरगाव 24 बाधित व 4 मृत, दिघी 13 बाधित, भैरवनाथनगर 60 बाधित व 2 मृत, वांगी खुर्द 92 बाधित व 3 मृत, भेर्डापूर 122 बाधित व 5 मृत, वडाळा 35 बाधित, नायगाव 33 बाधित 3 मृत, मातापूर 40 बाधित 2 मृत, कमालपूर 51 बाधित 3 मृत पावले आहेत. तालुक्यात 226 जनावरांवर उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर तालुक्यात सर्वाधिक लम्पीने आजारी जनावरे भेर्डापूर-122, टाकळीभान 96 असून सर्वाधिक मृत जनावरे खानापूर येथे तर मातापूर येथे केवळ 2 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात एकूण 62253 जनावरांचे लसीकरण झाले आहे. दररोज किमान 26 जनावरे लम्पीने आजारी पडत असतात. आतापर्यंत 458 जनावरे बरी झाली आहेत तर दररोज 27 जनावरे बरी होत आहेत. आतापर्यंत आजारी पशुधनापैकी 37 जनावरे बरे होण्याच्या मार्गावर आहेत तर 136 जनावरांवर चांगले उपचार सुरू आहेत. 28 जनावरे ही अत्यवस्थ आहेत अशा एकूण 231 जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहितीही डॉ. धिमते यांनी दिली.

ऊस तोडणी मजुरांच्या जनावरांचेही लसीकरणगरजेचे

सध्या उसाचा गाळप हंगाम सुरू झालेला आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध ठिकाणाहून ऊस वाहतुकीसाठी बैल आलेले आहेत. शिवाय ऊसतोड कामगार इतरही जनावरे आपल्यासोबत आणतात. त्या सर्वांचे लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. तरी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे व जनावरांचे आरोग्य अबाधित ठेवावे, असे आवाहन डॉ. विजय धिमते यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com