श्रीरामपूर तालुक्यातील पहिली दप्तरमुक्त कान्हेगावची शाळा

तालुक्याच्यादृष्टीने ही भूषणावह बाब-रणजीत बनकर
श्रीरामपूर तालुक्यातील पहिली दप्तरमुक्त कान्हेगावची शाळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हेगाव ही श्रीरामपूर तालुक्यातील पहिली दप्तरमुक्त शाळा झाल्याचा आपल्या सर्वांसाठी भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक रणजित बनकर यांनी केले.

कान्हेगाव शाळेतील लोकसहभागातून बनविण्यात आलेल्या दप्तरमुक्त कपाटाचे तसेच शाळेच्या कमानीचे उदघाटन पढेगाव येथील नेताजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व उद्योजक रणजित बनकर, सरपंच गीताराम खरात अध्यक्ष अरविंद खरात, उपाध्यक्ष अरुण खरात यांच्या हस्ते करण्यात आले.

लॉकडाऊन काळात शिक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी लोकसहभागातून निधी उभारण्याचे काम केले. कान्हेगाव शाळा गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिली असून शाळेच्या लौकिकास साजेशी कामगिरी केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, केंद्रप्रमुख संतोष जमदाडे यांनी अभिनंदन केले.

या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेहाना मुजावर शेख यांनी केले. तर आभार वैशाली थोरात यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com