श्रीरामपूर तालुक्यात अद्यावत रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न करणार- आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर तालुक्यात अद्यावत रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न करणार- आ. विखे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषद व सहकारी संस्था ताब्यात असूनही श्रीरामपूर तालुक्यासाठी सर्व सुखसोयींनी युक्त असे रुग्णालय उभारण्याची कुणाला सद्बुध्दी झाली नाही. तालुक्यातील गोरगरीबांना परवडेल असे सर्व सुखसोयींनी युक्त रुग्णालय श्रीरामपूरला उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या निधीतून सुमारे 61 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी आ. विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद नवले होते. व्यासपीठावर माजी सभापती दिपक पटारे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, नानासाहेब शिंदे, नानासाहेब पवार, संदिप चव्हाण, संगिता गांगुर्डे उपस्थित होते.

आ. विखे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी माजी खा. बाळासाहेब विखेंंपासून मी व खा. सुजय विखे यांनी सातत्याने लक्ष दिले आहे. श्रीरामपूर तालुका ही आमची मातृभूमी आहे. याच भावनेने आम्ही श्रीरामपूर तालुक्याकडे पाहिले आहे. आम्ही श्रीरामपूर तालुक्यासाठी काहीच केले नाही, असे आरोप करून काहींना बढती मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे. शेतमालाला भाव नाही, शेतकर्‍यांच्या हालअपेष्ठांकडे राज्य सरकारचे लक्ष नाही. असे असताना मुख्यमंत्री दोन वर्षे घराबाहेर पडले नाही.

करोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतल्यामुळेच करोना आटोक्यात आला. गोरगरीबांना मोफत गहू व तांदूळ वाटपाच्या निर्णयाने गोरगरीबांना दिलासा मिळाला. जायकवाडीला पाणी जाऊ नये व हे पाणी आपल्या परिसराला मिळावे यासाठी कोण जागरूक होते हे जनतेला माहिती आहे. पाण्याच्या योग्य नियोजनामुळे कालव्याच्या पाण्याची आवर्तने व बंधारे भरण्याचे नियोजन व्यवस्थित झाल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, अजित कवडे, दिपक पटारे, बाळासाहेब तोरणे, शरदराव नवले आदींची भाषणे झाली. यावेळी भगवंतराव कवडे, नानासाहेब तनपुरे, जयवंतराव कवडे, दौलतराव दांगट, बाळासाहेब तनपुरे, सरपंच अनिता कांदळकर, सोसायटीच्या अध्यक्षा रतनबाई कवडे, सुवर्णाताई काळे, अनिल देशमुख, विजय काळे, शिवाजी कवडे, नितीन दांगट, बाळासाहेब धनवटे, सागर धनवटे, निनाद कवडे, भगिरथ तनपुरे, प्रा.डॉ.बाबासाहेब पवार, पप्पू गवळी, ऍड.अरुण जंजीरे, अजित कवडे, बाळासाहेब कवडे, सुनील पवार, गणेश कवडे, हौशिराम दांगट, किशोर शेळके, काकासाहेब साळे, रमेश कवडे, आण्णासाहेब बडाख, कारभारी बडाख, नानासाहेब बडाख, रामभाऊ काळे, विश्वास तनपुरे, शमशुद्दीन शेख, शेरूभाई शेख, सचिन पोळ, विलास कापसे, कृष्णा कवडे, सुनील कहांडळ, सतीश दांगट, निलेश कवडे, संदिप दांगट, अरुण कवडे, लक्ष्मण कसबे, देवीदास कवडे, आकाश भोसले, तुषार जंजीरे, गणेश पानसरे, गंगाधर बर्डे, ज्ञानेश्वर टेकाळे, संभाजी निमसे, गंगाधर राऊत, राजेंद्र कापसे, आण्णासाहेब कांदळकर, काकासाहेब टेकाळे, काका कुसेकर उपस्थित होते. स्वागत सरपंच अनिता कांदळकर यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब तनपुरे यांनी तर गणेश कवडे यांनी आभार मानले.

शरद नवलेंचे कार्य कौतुकास्पद

जि. प. सदस्य शरद नवले यांच्या निधीतून 61 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ आपण केला आहे. जि. प. सदस्य किती चांगले काम करू शकतो हे आज आपण पाहिले आहे. संपूर्ण जिल्हा परिषद गटातील गावांनाही त्यांनी भरपूर निधी दिला आहे. शरद नवले यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे आ. विखे पा. म्हणाले.

Related Stories

No stories found.