श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यापैकी काल 11 ग्रामपंचायतीच्या

सरपंच तर 13 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या. तर तीन ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडी या निवडणुकीद्वारे झाल्या तर उर्वरीत सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या. 14 ग्रामपंचायतीच्या निवडी आज होणार आहेत.

काल झालेल्या 13 ग्रामपंचायतीच्या निवडीत कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आनंद गोरक्षनाथ वाघ तर उपसरपंचपदी ज्योती विजय पटारे, खोकर सरपंचपदी आशाबाई रावसाहेब चक्रनारायण उपसरपंचपद दीपक मोहन काळे, लाडगाव सरपंचपदी रजिया आलम पटेल उपसरपंचपदी विमल सोपान थोरे, महांकाळवाडगाव सरपंचपदी सौ. सुवर्णा राहुल चोरमळ उपसरपंचपदी नवनाथ वसंतराव पवार, निपाणी वडगाव चंद्रकला यशवंत गायधने, उपसरपंचपदी आबासाहेब बाजीराव राऊत, गोंडेगाव सरपंचपदी सागर अण्णासाहेब बढे, उपसरपंचपदी योगेश भानुदास बडधे, टाकळीभान सौ. अर्चना यशवंत रणनवरे, उपसरपंच संतोष उर्फ कान्हा अशोकराव खंडागळे, बेलापूर खुर्द सरपंच वर्षा प्रविण महाडीक,उपसरपंच दीपक पंडीतराव बारहाते, वडाळा महादेव सरपंच दादासाहेब देविदास झिंज उपसरपंच अशोक यादव गायकवाड, पढेगाव सरपंच किशोर मधुकर बनकर उपसरपंच नामदेव सुखदेव कांदळकर हे सर्व बिनविरोध झालेतर बेलापूर बुद्रुक सरपंचपदी महेंद्र जगन्नाथ साळवी बिनविरोध तर उपसरपंचपदी अभिषेक भास्करराव खंडागळे (मतदान), मांडवे- सरपंचपदाची निवड झाली नाही तर उपसरपंच गोविंद शिवराम तांबे बिनविरोध, गोवर्धनपूर सरपंचपदाची निवड झाली नाही तर उपसरपंचपदी राहुल राजधर जगताप (मतदान) निवडी झाल्या. 13 ग्रामपंचायतपैकी 11 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवड झाल्या असून यात 6 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला आरुढ झाल्या असून 5 ग्रामपंचायतीवर पुरुषांना संधी मिळाली आहे. तर उपसरपंचदी केवळ 2 ग्रामपंचायतीमध्ये निवडी करण्यात आल्या तर 11 ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांनी उपसरपंचपद आपल्या पारड्यात पाडून घेतले.