श्रीरामपूर तालुक्यात मुरकुटे-ससाणे गटाचे वर्चस्व

खंडाळा-शिवसेना-विखे, कमालपूर, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक मुरकुटे-ससाणे, माळेवाडी-ससाणे-आदिक तर उंबरगाव-भैरवनाथ विकास मंडळाचे सरपंच
श्रीरामपूर तालुक्यात मुरकुटे-ससाणे गटाचे वर्चस्व

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी कमालपूर व वांगी खुर्द या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या तर चार ग्रामपंचायतीच्या निवडणूका होवून काल झालेल्या मतमोजणीत खंडाळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना-विखे, कमालपूर, वांगी खुर्द व वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी व बहुमातत मुरकुटे-ससाणे गटाने बाजी मारली आहे. माळेवाडीत ससाणे आदिक गटाने सरपंचासह बहुमत प्राप्त केले आहे. तर उंबरगाव ग्रामपंचायतीत भैरवनाथ विकास मंडळाने सरपंचपद पटकावले असले तरी मात्र बहुमत मुरकुटे-ससाणे गटाने मिळविले आहे. त्यामुळे एकूण सहा ग्रामपंचायतीत मुरकुटे-ससाणे गटाने तालुक्यात वर्चस्व प्राप्त केले आहे. तालुक्यात या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका शांततेत पार पडल्या.

ग्रामपंचायतनिहाय निकाल - खंडाळा- ग्रामपंचायतीत शिवसेनेचे राधाकृष्ण बोरकर व विखे गट युतीच्या सरपंचपदाच्या उमेदवार छाया लक्ष्मण बर्डे 1851 मते मिळवून विजयी झाल्या आहेत तर विरोधी विखे गटाच्याच राधा संजय माळी यांना 1677 मते पडली आहेत. सदस्य- प्रभाग-1- रावसाहेब विश्वनाथ अभंग (402) विजयी, सोपान रामभाऊ अभंग (185), अमोल भास्कर ढोकचौळे (192), अजय दत्तात्रय ढोकचौळे (391) विजयी, मनिषा योगेश सोडणार (409) विजयी, गायत्री प्रशांत सोडणार (175), प्रभाग-2- अनिल रामकृष्ण ढोकचौळे (436) विजयी, अमोल राधाकृष्ण बोरकर (350), भिका चिमा खरात (332), ताराचंद दयानंद आलगुंडे (485) विजयी, सुमन गोपीनाथ पवार (369, लहानबाई गोरक्ष रजपूत (436) विजयी, प्रभाग-3- प्रताप माधवराव ढोकचौळे (250), प्रभाकर धनराज साबदे (446) विजयी, वंदना भिमराज विधावे (214), सोनाली रविंद्र विधावे (449) विजयी, जयश्री गणेश म्हसे (245), मंजुषा महेश ढोकचौळे (446) विजयी, प्रभाग-4- सुभाष हरी पवार (339), अशोक शिवाजी पवार (367)विजयी, वंदना भिमराज विधाने (256), भारती राहुल वाघमारे (435) विजयी, रंजना आप्पासाहेब पवार (310) अनिता संतोष मोरे (380) विजयी, प्रभाग-5- वृषाली किसन सोनवणे (407) विजयी, ज्योती गोरख पवार (324), संगिता विजय ढोकचौळे (370), विजयी, संगिता विजय सदाफळ (358), दिनकर जगन्नाथ सदाफळ (400) विजयी, राम नवनाथ ढोकचौळे (383). या ठिकाणी ना. राधाकृष्ण विखे, ससाणे- मुरकुटे गटाचा महाविकास आघाडी तर शिवसेना (बोरकर), विखे व कानडे गटाचे ग्रामविकास मंडळ यांच्यात एकास एक लढत होवून या ठिकाणी शिवसेना (बोरकर) ना. विखे गटाने आपली सत्ता अबाधित ठेवली आहे.

उंबरगाव- उंबरगाव ग्रामपंचायतीत ससाणे-मुरकुटे या गटाविरुध्द विराज भोसले यांचा भैरवनाथ विकास मंडळ अशी लढत झाली असून यात ससाणे मुरकुटे गटाने 6 जागा मिळवून बहुमत मिळविले असले तरी सरपंचपदी मात्र भोसले यांच्या भैरवनाथ विकास मंडळाने झेंडा रोवला आहे. सरपंचपदासाठी- अर्चना सचिन काळे (781 पराभूत) व सुप्रिया विराज भोसले (926 विजयी).

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 -जगन्नाथ शंकर गांगुर्डे (252), सवित्रा आबासाहेब राऊत (262) विजयी, नंदकिशोर सोपान काळे, (511) विजयी, भाऊसाहेब गोविंद भोकरे (210), वनिता किशोर कांडेकर, (333) विजयी, जयाबाई पांडुरंग डोळसे (186). प्रभाग-2-राजेंद्र गुंडीबा ओहोळ (411) विजयी, बापूराव धोंडीराम शेलार (258), अमृता सुरेश बर्डे (421) विजयी, स्वाती चिमाजी राऊत (242), राजश्री बाळासाहेब कोळसे (401) विजयी, वृषाली सचिन डोळसे (270). प्रभाग-3-प्रकाश गिताराम वारुळे (290) विजयी, सुधीर जालिंदर वारुळे (217), रेखा प्रकाश आढाव (329) विजयी, संगीता सुर्यकांत कोळसे (320) विजयी, मंगल अशोक काळे (229).

वांगी बुद्रुक - वांगी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी - ज्ञानेश्वर आसाराम बिडगर (499 विजयी), आप्पासाहेब बबन माने (467 पराभूत), प्रविण सुनील मोरे (57 पराभूत).

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 -बबन यशवंत आहेर (188), गोरक्षनाथ लक्ष्मण बर्डे (199) विजयी, स्वप्नील दत्तात्रय खेमनर (234) विजयी, गंगुबाई बाबासाहेब माने (154). प्रभाग-2-पोपट कारभारी कांबळे (188) विजयी, योगेश मच्छिंद्र कांबळे (138), कांताबाई भाऊसाहेब पवार (178) विजयी, यमुना बबन आहेर (150), रंजना दामोधर कोपनर (192) विजयी, मंगल बाळासाहेब नरोटे (135). प्रभाग-3-अनिता मच्छिंद्र बर्डे ( 118), मुक्ताबाई गोपीनथ निकम (187) विजयी, कांताबाई बाबासाहेब हळनोर (114), प्रभावती ज्ञानेश्वर लकडे (193) विजयी.

माळेवाडी - माळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी ससाणे-आदिक गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदासाठी - जयश्री सोपान औताडे (973 विजयी), अनिता दिलीप औताडे (666 पराभूत).

सदस्यपदासाठी - प्रभाग-1 -मदन गोविद हाडके (77), रोहिदास शंकर वमने (266) विजयी, राजेंद्र गोरक्षनाथ वमने (301) विजयी, रंगनाथ चंद्रभान हाडके (251). सुरेश भास्कर ढोबळे (281), ज्योती नामदेव उमाप (280), रेखा विनायक मोहन (310) विजयी), प्रभाग-2-बाबासाहेब दशरथ औताडे (244) विजयी, विष्णू अस्तिक रसाळ (174), मोहन विलास सयाजी (173), भागुबाई मगन घोडके (252) विजयी, मयुरी गोरख वमने (164), बेबी किशोर जाधव (260) विजयी. प्रभाग-3-अनिता दत्तात्रय औताडे (252), सुमन जालिंदर औताडे (351) विजयी, अर्चना अर्जुन गायकवाड (413) विजयी, बबीता प्रकाश सोनवणे (204). निशा शिवाजी तारडे (404) विजयी, अश्विीनी सुशिलकुमार वमने (211).

दरम्यान काल मतमोजणी सुरु असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. जसजसा निकाल येत होता तसतशी गुलालाची उधळण करत घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात येत होता. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत सदरची निवडणूक शांततेत पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तर सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार वाकचौरे, तसेच निवडणूक शाखेचे श्री. काळे यांनी काम पाहिले.

बिनविरोध ग्रामपंचायत कमालपूर

सरपंच- स्वाती सचिन मुरकुटे (ना. मा. प्र. स्त्री)

सदस्य- प्रभाग-1- उषा विनायक करपे (महिला), सुवर्णा सुनील गोरे (ना. मा. प्र. स्त्री), राहुल दत्तात्रय बारस्कर, प्रभाग-2 नंदू लक्ष्मण शिरसाठ (अनु. जाती), जिजाबाई बाळासाहेब जाधव (अनु. जमाती स्त्री), प्रभाग-3-किरण आप्पासाहेब गोरे, ललिता बाळासाहेब गोरे (महिला).

बिनविरोध ग्रामपंचायत वांगी खुर्द

सरपंच- संगिता राजू कांबळे (अनु.जाती स्त्री)

सदस्य- प्रभाग-1- अनिता ज्ञानेश्वर गायकवाड, चारुशिला विष्णूदास जगताप (महिला), सुभाष खंडू मोरे (अनु. जमाती), प्रभाग-2 अनिल मोहन कोपनर (ना. मा. प्रवर्ग), मिनाक्षी विजय पडळकर (महिला), प्रभाग-3- सचिन भगत राऊत (सर्वसाधारण), विमल गेणुदास मोरे, (अनु. जमाती स्त्री).

तालुक्यात सहा पैकी पाच ठिकाणी महिला सरपंच

श्रीरामपूर तालुक्यात सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होवून यात वांगी खुर्द-संगिता कांबळे, कमालपूर-स्वाती मुरकुटे, खंडाळा- छाया बर्डे, उंबरगाव सुप्रिया भोसले तर माळेवाडीच्या सरपंचपदी जयश्री औताडे अशा पाच महिला सरपंचपदी विराजमान झाल्या तर केवळ वांगी बुद्रूककच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर बिडगर या एकमेव पुरुषाची वर्णी लागली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com