
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील होत असलेल्या 17 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी 26 तर सदस्य पदासाठी 188 अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत सरपंच पदासाठी 31 तर सदस्य पदासाठी 214 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
जाफराबाद ग्रामपंचायत सदस्यासाठी 5 तर सरपंच 1, भोकर सदस्यासाठी 5 तर सरपंच 4, माळवाडगाव सदस्य 1, निमगाव खैरी सदस्य 9, सरपंच 3, नाऊर सदस्य 18, सरपंच 2, गुजरवाडी सदस्य 4, भैरवनाथनगर सदस्य 17, सरपंच 3, शिरसगाव सदस्य 22, कान्हेगाव सरपंचसाठी 2, खिर्डी सदस्य 19, सरपंच 3, रामपूर सदस्य 6, सरपंच 1, उंदिरगाव सदस्य 4, दिघी सदस्य 5, दत्तनगर सदस्य 61, सरपंच 4, फत्त्याबाद निरंक, उक्कलगाव सदस्य 9 तर सरपंचसाठी 2 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
कालही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रीयेमुळे विलंब झाला. दि. 16 ते 20 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. सुरवातीचे दोन दिवस तांत्रिक अडचणीमुळे अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करता आले नाही. त्यामुळे त्यांचे दोन दिवस वाया गेले. काल देखील सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागले. काल अखेर सतरा ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी एकूण 31 तर सदस्य पदासाठी 214 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी माजी सरपंचांसह चार उमेदवारी अर्ज दाखल झाले तर सदस्य पदासाठी पाच उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.
भोकर ग्रामपंचायतीत पाच प्रभागातून लोकनियुक्त सरपंच व 15 सदस्य पदासाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तीन दिवसांत एक ही उमेदवारी दाखल झालेला नव्हता. मात्र, काल चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी पाच उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली. त्यात सरपंच पदासाठी माजी सरपंच पुनम महेश पटारे, जयश्री गणेश छल्लारे, प्रतिभा जयंत लोखंडे व शितल प्रताप पटारे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे तर छाणणी सोमवार दि.23 ऑक्टेाबर रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होत आहे तर माघार घेण्यासाठी दि.25 आक्टेाबर दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे त्यानंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. मतदान दि.5 नोव्हेबर रोजी होत असून मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी होत आहे.