श्रीरामपूर तालुक्यात 148 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

15 नवीन करोनाबाधितांची भर
श्रीरामपूर तालुक्यात 148 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 15 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 148 असून हे सर्व रुग्ण ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 33 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 18 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 01 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 16531 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16384 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 02 तर ग्रामीण भागात 11 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-02 असे एकूण 15 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02 ग्रामीण भागात बेलापूर बुदु्रक-04, भेर्डापूर-01, कारेगाव-01, वळदगाव-02, टाकळीभान-01, वांगी खुर्द-01, गोंधवणी-01, असे ग्रामीण भागात 11 तर अन्य तालुक्यातील 2 असे 15 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com