श्रीरामपूर तालुक्यात 33 करोनाबाधितांची भर

श्रीरामपूर तालुक्यात 33 करोनाबाधितांची भर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) काल 33 नवीन करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 233 असून हे सर्व रुग्ण ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 35 रुग्ण बरे होवून घरी गेले.

खासगी रुग्णालयात 15 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 18 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 16339 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16152 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 02 तर ग्रामीण भागात 27 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-04 असे एकूण 33 रुग्ण आहेत.

शहरी भागात वॉर्ड नं. 2-02, ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-05, कुरणपूर-01, भेर्डापूर-03, कारेगाव-07, माळेवाडी-01, गोंधवणी-02, खडांळा-02, शिरसगाव-01, भामाठाण-01, वडाळा महादेव-03, अशोकनगर-01, असे ग्रामीण भागात 27 तर अन्य तालुक्यातील 04 असे 33 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com