श्रीरामपुरात 29 अ‍ॅक्टीव्ह करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपुरात 29 अ‍ॅक्टीव्ह करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर व तालुक्यात काल एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आले नाहीत. तसेच बरे होऊन 05 करोना रुग्ण घरी गेेले आहेत. त्यामुळे 29 करोना रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 17899 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17882 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

याअगोदर 19 व 2 नोव्हेंबर 2021 रोजी श्रीरामपूर व शहरामध्ये झिरो करोना रुग्ण आढळून आले. त्याअगोदरही या महिन्यात दररोज चार ते पाच रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले नाहीत. काल व परवा रुग्णांची संख्या दोन आकडी झाली होती. काल पुन्हा शहर व तालुक्यात एकही रुग्ण आढळून न आल्यामुळे जवळपास शहर व तालुक्याने करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com