श्रीरामपूर तालुक्यात केवळ 08 करोना बाधित रुग्ण

05 डिस्चार्ज तर 55 अ‍ॅक्टीव्ह
श्रीरामपूर तालुक्यात केवळ 08 करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ 08 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 05 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 55 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17752 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17695 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात-00, खासगी रुग्णालयात-07, तर अ‍ॅन्टीजनमध्ये-01 असे एकूण 08 रुग्ण आहेत. श्रीरामपूर शहरात 03 तर ग्रामीण भागात 02 व तालुक्याबाहेर अन्य शहरातील 03 असे एकूण 08 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात दोन असून यात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 7-02, असे 03, ग्रामीण भागात बेलापूर-01, नायगाव-01, असे 02 तर अन्य शहरातील 03 असे 08 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com