श्रीरामपूर तालुक्यात नवीन 9 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 9 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 09 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 11 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 44 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगी प्रयोगशाळेत 08 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 01 असे 09 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17623 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17577 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 02 तर ग्रामीण भागात 02 व तालुक्याबाहेर अन्य शहरातील 05 असे एकूण 09 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात दोन असून यात वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-01 असे 02, ग्रामीण भागात बेलापूर खुर्द-01 व उंदिरगाव-01 असे 02 तर अन्य शहरातील 05 असे 09 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.