श्रीरामपूर शहरात दोन करोना बाधित रुग्ण

ग्रामीण भागात 02 रुग्ण; 06 डिस्चार्ज तर 46 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर शहरात दोन करोना बाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ 05 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. त्यात शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन रुग्ण आहेत. 06 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 46 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Covid 19 Active Patient) उपचार घेत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात -01, खासगी प्रयोगशाळेत 01 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 03 असे 05 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17614 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17566 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 02 तर ग्रामीण भागात 02 व तालुक्याबाहेर अन्य शहरातील 01 असे एकूण 05 रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात दोन असून यात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01 असे 02, ग्रामीण भागात गळनिंब-01 व नाऊर-01 असे 01 तर अन्य शहरातील 01 असे 05, एकूण असे एकूण 06 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.

श्रीरामपूर शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन व अन्य शहरातील एक असे पाच रुग्ण आढळून आल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील करोना बाधित रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात मोठा दिलासा मिळाला आहे. तरी नागरिकांनी करोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com