श्रीरामपूर तालुक्यात 16 रुग्ण

26 डिस्चार्ज तर 102 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 16 रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 16 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 26 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 102 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Covid 19 Active Patient) उपचार घेत आहेत. काल जिल्हा रुग्णालयात -02, खासगी प्रयोगशाळेत 07 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 07 असे 16 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17568 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17466 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 04 तर ग्रामीण भागात 07 व बाहेरील तालुक्यातील-जेऊर-01, पुणतांबा-01, व श्रीरामपूर-03 शहर असे 05 तर एकूण 16 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-02, असे शहरात 04 तर ग्रामीण भागात बेलापूर बुद्रुक-01, खिर्डी-02, कान्हेगाव-01, भेर्डापूर-01, कारेगाव-01, अशोकनगर-01 असे एकूण 07 बाहेरील तालुक्यातील 05 रुग्ण असे एकूण 16 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.