श्रीरामपूर तालुक्यात केवळ 8 नवीन करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात केवळ 8 नवीन करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन केवळ 08 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 115 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल खासगी प्रयोगशाळेत 06 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 02 असे 08 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) आतापर्यंत सुमारे 17541 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17426 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01 असे शहरात 02 तर ग्रामीण भागात हरेगाव, पाचवाडी-05 असे एकूण 05 तर बाहेरील तालुक्यातील 01 रुग्ण असे एकूण 8 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com