श्रीरामपूर तालुक्यात नवीन 16 करोना रुग्ण

43 डिस्चार्ज तर 119 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात नवीन 16 करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 16 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 43 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 119 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल खासगी प्रयोगशाळेत 14 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Patient) 02 असे 16 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17533रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17414 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 03 तर ग्रामीण भागात 13 असे एकूण 16 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 7-02 तर ग्रामीण भागात बेलापूर खुर्द-01, कारेगाव-02, हरेगाव-02, वडाळामहादेव-02, रामपूर-02, माळवाडगाव-04 असे असे एकूण 16 करोना बाधित रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.