श्रीरामपूर तालुक्यात तीन गावे सील; 21 रुग्ण

25 डिस्चार्ज तर 146 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात तीन गावे सील; 21 रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 21 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 25 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 146 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. तालुक्यातील तीन गावांत रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनाने ही तीन गावे सात दिवस बंद केली आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात -00, खासगी प्रयोगशाळेत 18 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 03 असे 21 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 17517 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17371 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 07 तर ग्रामीण भागात 10 व बाहेरील तालुक्यातील-04 असे एकूण 21 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 7-06 असे शहरात 07 तर ग्रामीण भागात खंडाळा-01, कडीत-01-, नाऊर-01, कारेगाव-01, वांगी खुर्द-01, नायगाव-01, भोकर-01, कान्हेगाव-01, खोकर-01, वडाळामहादेव-01, असे ग्रामीण भागात 10 आढळून आले आहेत. असे 21 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यातील (Shrirampur Taluka) बेलापूर खुर्द, उक्कलगाव व कारेगाव या तीन गावांत करोना बाधितांची संख्या वाढल्याने प्रशासनाने ही तीनही गावे सील केली आहेत. या गावांतील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.