श्रीरामपूर तालुक्यात 27 करोनाबाधित रुग्ण

28 डिस्चार्ज तर 150 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 27 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 27 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 28 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 150 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगी प्रयोगशाळेत 19 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 08 असे 27 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17496 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17346 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 08 तर ग्रामीण भागात 15 व बाहेरील तालुक्यातील-04 असे एकूण 27 रुग्ण आहेत.

शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 3-04, वॉर्ड नं. 7-03 असे शहरात 08 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-03, दिघी-01, कारेगाव-02, निमगाव खैरी-01, भोकर-01, गोंधवणी-01, टाकळीभान-06, असे ग्रामीण भागात 15 आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.