श्रीरामपूर तालुक्यात 43 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 43 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 43 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Patient) आढळून आले आहेत. तर 27 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 190 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल जिल्हा रुग्णालयात -00, खासगी प्रयोगशाळेत 43 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 00 असे 43 रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17400 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17210 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 16 तर ग्रामीण भागात 26 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-01 असे एकूण 41 रुग्ण आहेत.

शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-5, वॉडर्र् नं. 4-01, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-10 असे शहरात 16 तर ग्रामीण भागात बेलापूर -02 कारेगाव-03, गोंधवणी-01, अशोकनगर-03 भामाठाण-01, पढेगाव 5, निपाणीवगाव-01, भोकर-01, निमगाव खैरी-01, खंडाळा-01,गोवर्धन-02, मालुंजा-01, भेर्डापूर-01, रांजणखोल-04 असे ग्रामीण भागात 26 रुग्ण आढळून आले आहेत. असे 43 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.