श्रीरामपूर तालुक्यात 28 करोनाबाधित रुग्ण

17 डिस्चार्ज तर 179 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 28 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 28 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 17 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 179 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात -01, खासगी प्रयोगशाळेत 21 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 06 असे 28 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसात सुमारे 17331 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 17162 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 07 तर ग्रामीण भागात 19 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-02 असे एकूण 28 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-06 तर ग्रामीण भागात बेलापूर खुर्द 02, उक्कलगाव-01, मांडवे-01, कुरणपूर-01 कारेगाव-04, महांकाळवाडगाव-01, निपाणीवडगाव-02, हरेगाव-02, उंदिरगाव-02, खानापूर-02, गोंधवणी-01, असे ग्रामीण भागात 19 आढळून आले आहेत. बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 03 असे 28 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.