श्रीरामपूर तालुक्यात 46 करोनाबाधित रुग्ण

13 डिस्चार्ज तर 151 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
श्रीरामपूर तालुक्यात 46 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 46 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 151 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल खासगीत प्रयोगशाळेत 43 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 03 असे 46 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 17267 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19) झाली होती. तर त्यातील सुमारे 17126 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 09 तर ग्रामीण भागात 35 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-02 असे एकूण 46 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-04, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-03 असे शहरात 09 तर ग्रामीण भागात बेलापूर खुर्द 09, एकलहरे-01, उक्कलगाव-06, मांडवे-01, भेर्डापूर-04, कारेगाव-08, टाकळीभान-02, उंदिरगाव-01, हरेगाव-01, निमगावखैरी-01, अशोकनगर-01, असे ग्रामीण भागात 35 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत अशा 02 रुग्णांसह एकूण 46 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.