श्रीरामपूर तालुक्यात 27 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 27 करोनाबाधित रुग्ण

23 डिस्चार्ज तर 119 अ‍ॅक्टीव्ह

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 27 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळून आले आहेत. तर 23 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 119 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत. काल जिल्हा रुग्णालयात 03, खासगीत 16 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 08 असे 27 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 17199 रुग्णांना करोनाची लागण झाली होती.

तर त्यातील सुमारे 17090 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात (Shrirampur City) 07 तर ग्रामीण भागात 12 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-08 असे एकूण 27 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 7-03 असे शहरात 07 तर ग्रामीण भागात बेलापूर-03, वडाळा महादेव-04, भोकर-01, खंडाळा-01, हरेगाव-03, मुठेवाडगाव-01 असे ग्रामीण भागात 12 आढळून आले आहेत. बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 08 असे 27 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.