श्रीरामपूर तालुक्यात 18 करोनाबाधित रुग्ण

21 डिस्चार्ज तर 84 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण
corona
corona

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल केवळ 18 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient)आढळून आले आहेत. तर 21 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे 84 करोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active patient) उपचार घेत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात 00, खासगीत 11 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 07 असे 18 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 16807 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 16685 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 05 तर ग्रामीण भागात 08 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-05 असे एकूण 18 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 6-02, वॉर्ड नं. 7-02, असे 05 शहरात तर ग्रामीण भागात उक्कलगाव-02, निमगावखैरी-02, फत्त्याबाद-02, गोंडेगाव-01, खानापूर-01 असे ग्रामीण भागात 08 रुग्ण आढळून आले आहेत. बाहेरील अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 05 असे 18 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com