श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण

18 डिस्चार्ज तर 87 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल नवीन 10 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. तर 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 87 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण (Active Patient) उपचार घेत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात 01, खासगीत 06 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 03 असे 10 रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16789 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16664 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 02 तर ग्रामीण भागात 07 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-01 असे एकूण 10 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं.4-01, वॉर्ड नं. 6-01, असे 02 शहरात तर ग्रामीण भागात कारेगाव-02, खिर्डी-02, फत्याबाद-02, खोकर-01 असे ग्रामीण भागात 07 आढळून आले आहेत. बाहेरीत अन्य जिल्हा व अन्य तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाहीत असे 01 असे 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com