श्रीरामपूर तालुक्यात 98 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

21 बाधित; 34 जणांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात 98 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 21 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या 98 वर जावून पोहोचली. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 34 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

खासगी रुग्णालयात 16 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत (Antigen Testing) 05 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) गेल्या काही दिवसांत सुमारे 16582 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19) झाली होती. तर त्यातील सुमारे 16484 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरात 05 तर ग्रामीण भागात 14 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-02 असे एकूण 21 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 7-01 ग्रामीण भागात बेलापर बुद्रुक-02, कडीत बुद्रुक-01, महांकाळवाडगाव-01, गोंधवणी-01, शिरसगाव-03, माळवाडगाव-04, वडाळा महादेव-01, अशोकनगर-01 असे ग्रामीण भागात 15 तर अन्य तालुक्यातील 00 असे 19 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com