श्रीरामपूर तालुक्यात केवळ 3 नवीन रुग्ण

13 करोना रुग्णांना डिस्चार्ज
श्रीरामपूर तालुक्यात केवळ 3 नवीन रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) काल केवळ 03 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 62 असून हे सर्व रुग्ण ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 13 रुग्ण बरे होवून घरी गेले.

खासगी रुग्णालयात 02 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत (Antigen Testing) 01 असे 03रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 16606 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 Positive) झाली होती. तर त्यातील सुमारे 16544 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 01 तर ग्रामीण भागात 02 असे एकूण 03 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-01, ग्रामीण भागात बेलापर खुर्द-01, हरेगाव-01, असे असे 03 रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com