श्रीरामपूरच्या बस चालकाला नगरमध्ये मारहाण

हॉर्न वाजविल्याचे कारण || दोघांविरूध्द गुन्हा
श्रीरामपूरच्या बस चालकाला नगरमध्ये मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉर्न वाजविल्याच्या कारणातून एसटी बस चालकाला (ST Bus Driver) शिवीगाळ करत मारहाण (Beating) करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी (दि. 11) दुपारी चार वाजता डी.एस.पी. चौक ते माळीवाडा (Maliwada) रस्त्या दरम्यान नटराज हॉटेलच्या समोर घडली. याप्रकरणी बस चालक सोपान विठ्ठल पवार (वय 35 रा. वांगी, ता. श्रीरामपूर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

मुजिब ऊर्फ भुर्र्‍या अजिज खान (रा. मुल्ला कॉलनी, मुकुंदनगर) व अरिफ जाबीर खान (रा. दगडी चाळ, मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. चालक पवार व वाहक संतोष धीवर हे त्यांच्याकडील श्रीरामपूर ते पुणे एसटी बस (एमएच 14 बीटी 4169) प्रवाशी घेऊन नगर शहरातील डी.एस.पी. चौक ते माळीवाडा रस्त्याने जात असताना नटराज हॉटेल समोर दोघांनी बसला दुचाकी (Bike) आडवी लावली. हॉर्न वाजविल्याच्या कारणातून चालक पवार यांना शिवीगाळ केली व बसमध्ये चढून मारहाण (Beating) करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com