कोवीड काळात आरोग्यसेवक व अंगणवाडी सेविकांची कामगिरी अनमोल- डॉ. मुरकुटे

कोवीड काळात आरोग्यसेवक व अंगणवाडी सेविकांची कामगिरी अनमोल- डॉ. मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोना रुग्णांची संख्याही सर्वत्र घटत आहे. यामागे करोना कालावधीत कष्ट घेतलेले आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, सफाई कामगार आणि ज्ञात अज्ञात मंडळींचे मोलाचे कार्य असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.

सभापती डॉ. मुरकुटे यांनी निमगाव खैरी, उंदिरगाव, कुरणपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांना भेटी दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रप्रमुख डॉ. धापटे व प्रा. आ. केंद्रातील कर्मचारी, महिला बाल कल्याणच्या श्रीमती आशा लिप्टे व त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या. डॉ. मुरकुटे यांनी येथे दाखल रुग्णांची विचारपूस केली.

वास्तल्य विकास योजनेंतर्गत नोंदी करून लवकरात लवकर लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा, तसेच करोनाने मरण पावलेल्या कुटुंबियांच्या नातेवाईकांना शासनाकडून मिळणारा लाभ लवकरात लवकर मिळवून द्यावा, याबाबत सूचना त्यांनी केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांनी रुग्णांकडे व विशेषत: गरोदर महिलांकडे जातीने लक्ष द्यावे.

निमगाव खैरी, कुरणपूर येथील अंगणवाडी सेविकांच्या कार्याबद्दल त्यानी कौतुक केले, उंदीरगाव, हरेगाव येथील आदिवासी लोक मोलमजुरी करून आपला उदारनिर्वाह चालवितात. त्यांना मोफत उपचारासाठी कुठल्याही अडचणी आल्या नाही पाहिजेत, अंगणवाडी ताईनी दिलेले टार्गेट वेळेत पूर्ण करावे, घर ते घर जाऊन शासनामार्फत देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांक मार्गदर्शनासाठी वापरण्यात यावा, असे सुचविले.

महिला व बालकल्याणच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती लिप्टे यांनी कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी उंदिरगाव येथील आरोग्य केंद्राचे डॉ. राजगुरू, आरोग्यसेवक, अंगणवाडी मीराताई भागडे, सारीका ढोबळे, मंदा ढोबळे, अनिता काजळे, शेख ताई, पंडितताई, वृक्षमित्र मच्छिंद्र पारखे रमेश देठे, बाबासाहेब हाळनोर, सचिन देठे, बाबु हाळनोर, सुभाष देठे, सुदाम पारखे, सोपान पारखे, योगेश हाळनोर,बापुसाहेब शिंदे, कैलास ऐनोर, काशिनाथ चितळकर, डॉ. खेडकर, सोडनार, सुखदेव पारखे, अचपळे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com