श्रीरामपुरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट

श्रीरामपुरात शॉर्टसर्किटमुळे आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील गोंधवणी रोडवरील फातेमा हाउसींग सोसायटीत नदीम मेमन यांच्या घराच्या प्रांगणात विद्युत तारेच्या शार्ट सर्किटमुळे आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेने परीसरात एकच धावपळ उडाली. काल रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

यावेळी शेजारी राहणारे रेल्वे ऑफीसर नईम खान यांनी प्रसंगावधान दाखवून घरातील वृद्ध महिलांना बाहेर काढले तसेच स्थानिक रहिवासी सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई शेख यांनी अग्निशमन दलास माहिती देताच श्रीरामपूर नगर परिषदेची अग्नीशमन गाडी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला.

यावेळी कामगार नेते दीपक चरणदादा चव्हाण, ताराचंद रणदिवे, नईमभाई पठाण, इम्रानभाई शेख, रजा शेख, अ‍ॅड. सलमान पठाण, फिरोजभाई पठाण, अझर शेख, अल्ताफ शहा, श्रीरामपूर नगर परिषदेचे अग्नीशमन दलाचे कर्मचारी अशोक गीरी, सिध्दार्थ डोंगरे, आकाश साळवे आदींंनी आग विझविण्यासाठी मदत केल्याने सुदैवाने कुठलाही अनर्थ घडला नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com