श्रीरामपुरात दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांच्या साहित्याची चोरी

श्रीरामपुरात दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांच्या साहित्याची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दिवाळीच्या आदल्या दिवशी रात्री शहरातील बंद दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नेवासारोड परिसरात घडली आहे.

राहुल गंगाधर पवार (वय 30, रा. वांगी, ता. श्रीरामपूर) यांचे नेवासा रोडवर कांदा मार्केट पेट्रोलपंपासमोर भगवती ग्रो सर्व्हिसेस या नावाचे उद्योगासाठी आवश्यक वस्तूंचे दुकान आहे. याबाबत पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते दि. 23 ऑक्टोबरच्या सकाळी 9 पूर्वी अज्ञात चोरट्याने आपल्या भगवती ग्रो सर्व्हिसेस नावाच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

त्यांनी दुकानातील 1 लाख 28 हजार रूपये किंमतीचे ठिबकचे 40 बंडल त्यात प्लेन वॉटर 10 बंडल, 90 हजार रुपयांच्या सोना कंपनीच्या स्प्रिंक्लर गनच्या 10 गोण्या, 14 हजार 100 रुपयांचे सोना कंपनीचे 6 नग लोखंडी फिल्टर आणि 10 हजार 546 रुपये किंमतीचे शेती उपयोगी किरकोळ साहित्य असा 2 लाख 42 हजार 646 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राहुल गंगाधर पवार यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द भादंवि कलम 457, 380 अन्वये गन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्री. पंडीत करीत आहेत. डिवायएसपी संदीप मिटके यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com