सार्वमत

श्रीराम भक्तांचे श्रीरामपूरमध्ये शीला पूजन

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

आयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे मंदिर उभारणीस सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर तिलक डुंगरवाल यांच्याकडे समुद्रामध्ये रामसेतू उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या शीला पैकी एक शीला त्यांनी यावेळेस पूजनासाठी दिली. यावेळी श्रीराम मंदिरात विधीवत पूजा करण्यात येवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या शिलेची छत्रपती राजे संभाजी चौकात आणून तिची विधिवत पूजा करण्यात आली. विविध संघटना पक्षाच्यावतीने शीला पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या प्रतिमेची यावेळी पूजन करण्यात येवूने जय श्रीरामचा जयघोष करत पेढे वाटण्यात आले. यावेळी श्रीराम मंदिरचा इतिहास हा वेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाला.भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाचा एक वचनी म्हणून इतिहास आहे.

आजचा दिवस भारतीयांच्या स्मरणात राहून इतिहासात या दिवसाची नोंद होईल असे विचार याप्रसंगी अनेकांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडवे, ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा, विश्व हिंदू परिषदेचे रुपेश हरकल,

नगरसेवक जितू छाजेड, नगरसेवक संतोष कांबळे, छत्रपती राजे संभाजी चौक मित्र मंडळ अध्यक्ष अमोल सावंत, विकास डेंगळे, भरत जाधव, निखिल पवार, यासीन सय्यद, योगेश ओझा, दीपक डावकर, राहुल रणपिसे, राहुल केदार, रोहित भोसले, प्रसाद बिल्डीकर, यशवंत जेठे, बाळू जोशी, दीपक उघडे, बी एम पवार, विष्णू भागवत, राजू यादव ,राहुल गायकवाड, सचिन जगरवाल, आशिष इंगळे कुणाल कांबळे, देवेंद्र गोरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com