श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असून त्या ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार सरपंच निवडीचा कार्यक्रम झाला असून तालुक्यातील 13 सरपंचपदाच्या आज तर उद्या बुधवार दि. 10 फेबुवारी रोजी 14 सरपंचांच्या निवडी होणार आहे.

आज मंगळवार दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता टाकळीभान, बेलापूर बुद्रुक, निपाणीवडगाव, वडाळा महादेव, कारेगाव, बेलापूर खुर्द, पढेगाव, गोंडेगाव, लाडगाव, खोकर, महांकाळवाडगाव, मांडवे, गोवर्धनपूर या ग्रामपंचायतींच्या तर उद्या बुधवार दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी भेर्डापूर, मालुंजा बुद्रुक, वळदगाव, गळनिंब, ब्राम्हणगाव वेताळ, एकलहरे, घुमनदेव, नायगाव, मुठेवाडगाव, मातुलठाण, कुरणपूर, सराला, खानापूर, मातापूर या 14 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडी होणार आहे.

सरपंचपदाच्या निवडीमुळे गावागावात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. आरक्षणामुळे काही गावातील सरपंच कोण होणार हे निश्चित झाले आहे. मात्र काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे काही ठिकाणी कोण सरपंच होणार ही उत्सुकता लागून आहे.