श्रीरामपूर आरटीओ कार्यालय परिसरात बिबट्याचा पाळीवर कुत्र्यावर हल्ला

श्रीरामपूर आरटीओ कार्यालय परिसरात बिबट्याचा पाळीवर कुत्र्यावर हल्ला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील सूर्यानगर भागात बिबट्याने (Leopard) एका हरणाची शिकार केल्याची घटना ताजी असतानाच काल बिबट्याने (leopard) आरटीओ कार्यालयाच्या (RTO Office) परिसरात एका कुत्र्याचा (Dog) फडशा पाडला. त्यामुळे श्रीरामपूर (Shrirampur) शहरात बिबट्याचा संचार सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

श्रीरामपूर शहरातील आरटीओ कार्यालया शेजारी असणार्‍या तलावाजवळ बिबट्याने (Leopard) एका पाळीव कुत्र्याला (Dog) घरातून ओढत नेऊन त्याच्यावर हल्ला (Attack) केला. या हल्ल्यात हा पाळीव कुत्रा जागीच ठार (Dog Death) झाला आहे.

या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण (Atmosphere of Fear) निर्माण झाले आहे. वन विभागाने (Forest Department) तात्काळ श्रीरामपूर शहरात फिरणार्‍या या बिबट्याचा बंदोबस्त केला नाही तर हा बिबट्या जनावरांनंतर थेट माणसांवर हल्ला करू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी वन विभागाने याची प्राधान्याने दखल घ्यावी. सुर्यानगर भागात वनविभागाने आठ दिवसांपासून पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्याने (Leopard) या पिंजर्‍याला हुलकावणी दिली आहे. यात बिबट्याचे सावज म्हणून ठेवण्यात आलेला बोकड मात्र एकाच दिवसात कोणीतरी लंपास केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com