श्रीरामपुरात रेल्वेखाली तरुणाचा मृत्यू

घात की अपघात? तर्क विर्तकांना उधाण
file photo
file photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपुरातील ओव्हर ब्रिजजवळ रात्रीच्या वेळी एका 22 वर्षीय पदवीधर तरुणाचा रेल्वे रूळावर मृत्यू झाला. सदर मयत तरुण हा सूतगिरणी रोडवर राहणारा असून त्याची मोटारसायकल नेवासा रोड येथील भुयारी पुलाजवळ आढळल्याने सदर तरुणाचा घात की अपघात? याबाबत विविध तर्क वितर्क लढविले जात आहेत.

अक्षय सुभाष दांगट असे या तरुणाचे नाव असून तो श्रीरामपुरातील संगमनेर रोडवर मेसचा व्यवसाय करत होता. त्याचा मृतदेह नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रिजजवळील रेल्वे रूळावर आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या. सदर तरुणाचा मृतदेह ओव्हर ब्रिजच्या जवळील रेल्वे रूळावर आढळला तर त्याची मोटारसायकल इतक्या अंतरावर नेवासारोडवरील रेल्वे अंडरग्राउंंड पुलाजवळ कशी? असा सवाल सदर तरुणाच्या अंत्यविधी प्रसंगी लोकांच्या चर्चेमधून विचारला जात होता. त्यामुळे सदर तरुणाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com