
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- करोनाबाधित नेत्याच्या संपर्कात आल्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षांसह 9 जण स्वतःहून क्वारंटाईन झाले आहेत. त्यांना येथील अजितदादा पवार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शहरातील अमरधाम समोरील रस्त्यात चिखलात खुर्च्या टाकून अभिनव आंदोलन केले होते. दरम्यान एका अधिकार्यापाठोपाठ लोकप्रतिनिधींचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कात अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आले होते त्यांनीही स्वतःकोणत्याही प्रकारची शंका नको म्हणून काल एका खासगी रुग्णालयात जाऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
त्यानंतर उपनगराध्यक्षांसह त्यांच्याबरोबर नेहमी असणार्या 9 जणांनी स्वतःहून रुग्णालयात जाऊन स्वॅब तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर त्यांना पवार पॉलिटेक्निकल महाविद्यालयाच्या विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले आहे.