श्रीरामपूर डाक कार्यालयाला वितरणात महाराष्ट्रात पहिला पुरस्कार - शिंदे

श्रीरामपूर डाक कार्यालयाला वितरणात महाराष्ट्रात पहिला पुरस्कार - शिंदे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील पोस्ट खात्याचे डाक अधीक्षक कार्यालय हे सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रात टपाल वितरणात पहिल्या क्रमांकाचे असल्याचे गौरवोद्गार सहाय्यक अधीक्षक विनायक शिंदे यांनी काढले. एसटीचे सहकार्य व येथील पोस्ट ग्राहकांच्या सहकार्यातून व सर्व कर्मचार्‍यांच्या मेहनतीने श्रीरामपूर डाक अधीक्षक कार्यालयाला महाराष्ट्रात पहिला पुरस्कार मिळाल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

श्रीरामपूर डाक कार्यालयात जागतिक डाक दिवस व राष्ट्रीय डाक सप्ताहाचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे व श्रीरामपूर एसटी डेपोचे मॅनेजर राकेश शिवदे यांच्याहस्ते फित कापून झाला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार अवचट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले की, श्रीरामपूर डाक कार्यालयाला नेहमीच ग्राहकांचे सहकार्य लाभल्याने येथील सर्व पोस्टाच्या सुविधा ग्राहकांना लाभदायक ठरत आहेत. हजारो पासपोर्टचे काम येथे होत आहे. पोस्टाच्या बँकिंगमध्येही प्रचंड ठेवी वाढल्या असून लाखो खातेदार बँक सेवेचा लाभ घेत आहेत.

पत्रकार आगे म्हणाले, पोस्ट खाते हे सर्व सरकारी खात्यातील प्रामाणिक व आपलेपणाने सेवा देणारे आहे. त्यांच्या कामाला नेहमीच जनतेने साथ दिली आहे. बँकिंग व्यवसाय वाढविल्यास पोस्टाचे काम आणखी वाढेल. श्रीरामपूर एसटी डेपो मॅनेजर शिवदे यांनी पोस्ट खात्याचे काम विश्वासपात्र असून एसटीचे नेहमी त्यांना सहकार्य राहील, असे सांगितले. आठ दिवस विविध कार्यक्रम घेऊन डाक सप्ताह विभागात साजरा होणार असल्याची माहिती तक्रार सहाय्यक प्रविण खंडागळे यांनी दिली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अवचट, कमलकिशोर मुंदडा, श्रीमती शर्मा यांनी सूचना मांडल्या. पोस्ट खात्याच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सहाय्यक अधीक्षक विनायक शिंदे, पोस्ट मास्तर भाऊसाहेब शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाळासाहेब बोडगे यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.