श्रीरामपूर पोलिसांनी गुटखा पकडला

श्रीरामपूर पोलिसांनी गुटखा पकडला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मधील काजी बाबा रोडवर कादर नावाच्या एका इसमाला गुटखा बाळगला म्हणून पोलिसांनी त्यास पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वार्ड नंबर 2 मधील काजी बाबा रोडवर एका इसमाकडे गुटखा असल्याची माहिती पालिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवी, श्री. गोसाव, श्री. पोकळे या पोलीस पथकाने काल दुपारी 1 वाजताच्या सुमारास पकडले. कादर हा काजी बाबा रोडवरील त्याच्या घराजवळ एकूण जवळपास दहा हजार रुपयांच्या गुटख्यासह मिळुन आला.

कादर याच्याकडुन पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यामध्ये विमल आणि आर एमडी कंपनीचा गुटखा याचा समावेश आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनने पुढील कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रतिसाद मिळताच पकडलेला आरोपी कादर याच्यावर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांनी तजवीज ठेवली आहे.

राज्यभर शासने गुटखा बंदी केलेली असतांना काही महिन्यापूर्वी श्रीरामपूर शहर पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला होता आणि ते प्रकरण जिल्हाभर गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 मध्ये 10 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आज रोजी पकडण्यात आला आहे. बंदी असतांना गुटख्याची सर्रास विक्री होत असल्याने या घटनेची देखील चांगलीच चर्चा होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com