श्रीरामपूर पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांची याचिका सुप्रीमने फेटाळली

श्रीरामपूर पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांची याचिका सुप्रीमने फेटाळली

डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर पंचायत समितीच्या (Shrirampur Panchayat Samiti) गटनेतेपदाच्या निवडीप्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) काँग्रेसच्या डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे (Congress Dr. Vandana Dnyaneshwar Murkute) यांच्या बाजूने निकाल दिला असता. त्यावेळी संगिता शिंदे (Sangita Shinde) यांनी उच्च न्यायालयाच्या (High Court) निर्णयाविरुध्द सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपिल केले होते. काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई (Justice B. R. Gavai) व न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव (Justice L. Nageshwar Rao) यांनी उच्च न्यायालयाचा (High Court) निर्णय ग्राह्य धरून संगीता शिंदे (Sangita Shinde) यांची याचिका फेटाळून (petition was dismissed) लावली.

सन 2017 मध्ये चुरशीच्या झालेल्या श्रीरामपूर पंचायत समिती निवडणुकीत (Shrirampur Panchayat Samiti Election) काँग्रेस पक्षाचे डॉ. वंदना मुरकुटे (Congress Dr. Vandana Dnyaneshwar Murkute), अरुण पाटील नाईक (Arun Patil naik), विजय शिंदे (Vijay Shinde) व संगीता शिंदे (Sangita Shinde) असे चार अधिकृत सदस्य विजयी झाले. पुढे सभापती निवडीच्यावेळी (Speaker election0 ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आठ सदस्यीय असणार्‍या पंचायत समितीमध्ये डॉ. वंदना मुरकुटे व संगीता शिंदे या दोन महिला सदस्यांना संधी प्राप्त झाली. त्यावेळी निवडीच्या आधी तालुक्यात एक नवे समीकरण उदयास आले.

काँग्रेस पक्षाच्या सभापती पदाच्या अधिकृत उमेदवार डॉ. वंदना मुरकुटे यांना घोषित केले असताना ऐनवेळी संगीता नाना शिंदे यांनी विरोधी सदस्यांची मदत घेऊन सभापतीपद मिळवले. परंतु गट हिताचे काम होत नसल्याने पक्षाने डॉ. वंदना मुरकुटे यांची रितसर मिटिंग घेऊन गटनेते पदी निवड केली व सदर गट नेते पदाला जिल्हाधिकारी यांनी संमती दिल्याने संगीता शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांनी डॉ. वंदना मुरकुटे यांची केलेली निवड चुकीची आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.

परंतु उच्च न्यायालयालयाच्या औरंगाबाद खंडपिठानेही शिंदे यांची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सौ. शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली. त्या प्रकरणावर काल सुनावणी झाली असता सुप्रीम कोर्टाने शिंदे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली. त्यामुळे आता काँग्रेसच्या गटनेत्या डॉ. वंदना मुरकुटे यांचा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. वंदना मुरकुटे यांच्यावतीने अ‍ॅड. रवींद्र अडसुरे व अ‍ॅड. यश सोनवणे यांनी तर संगिता शिंदे यांच्यावतीने अ‍ॅड. संजय खर्डे, अ‍ॅड. सत्यजित खर्डे यांनी काम पाहिले.

श्रीरामपूर पंचायत समिती गटनेतेपदाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या विरुध्द गेला असला तरी अद्याप जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय बाकी आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयानंतर पुढे काय करायचे ते आम्ही पाहू, अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सभापती संगीता शिंदे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com