file photo
file photo
सार्वमत

पालिकेच्या कचरा गाड्यांना तातडीने सायरन बसवावे

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

येथील नगरपरिषदेने नवीन सोळा घंटा गाड्यांना सायरन बसून घ्यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

नगरपरिषदेने पंधरा दिवसापूर्वी नवीन सोळा घंटागाड्या कचरा गोळा करण्यासाठी खरेदी केल्या आहेत. परंतु अजूनही घंटागाड्यास सायरन बसविला नसल्याने घंटा गाडी कधी येते कधी जाते हे नागरिकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरी कचरा साचला आहे. यापूर्वीही घंटा गाडीचे सायरन बंद पडले होते. त्यावेळी नागरिकांनी सायरन दुरुस्त करावेत, अशी मागणी लावून धरली होती.

या शहरात अनेक नागरिक दोन व तीन मजली इमारतीमध्ये हे राहतात. त्यामुळे घंटागाडीस सायरन बसविला नसल्याने गाडी येऊन गेली तरी महिलांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकांच्या घरात कचरा साचला आहे.

तर काही जणांनी लांब जाऊन कचरा कुंडीचा शोध लावून त्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला आहे. तरी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांनी त्वरित सोळा घंटागाडीस सायरन बसविण्यात यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com