श्रीरामपूर पालिका लवकरच कोव्हिड सेंटर उभे करणार

श्रीरामपूर पालिका लवकरच कोव्हिड सेंटर उभे करणार
श्रीरामपूर नगरपरिषद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. लहु कानडे यांच्या सहकार्याने

श्रीरामपूर शहरात लवकरच कोव्हिड सेंटर उभे राहणार असल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.

सध्या करोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असून त्यांचा आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे. शहराबरोबरच सर्व ठिकाणचे हॉस्पिटल फुल्ल झाले आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच ऑक्सीजन व औषधाची कमतरता आहे. परिस्थिती शहरात आहे. याच गोष्टीचा गांभीर्याने विचार करत नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी पुढाकार घेऊन शहरात पालिकेचे कोव्हिड सेंटर उभे करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. त्यामुळे लवकरच पालिकेचे कोव्हिड सेंटर उभे राहणार आहे.

करोना आजाराचे गंभीर परिस्थीतीत देखील काही ठराविक लोक राजकारण करताना दिसत आहे. राजकारण करणार्‍यानी अडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना काय मदत केली याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षभरापासून नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी वेगवेगळ्या स्वरुपात शहरातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. पंरतु असे संकटाच्या काळात देखील राजकारण करुन आपले हित साधणार्‍या संधी साधुंचा आम्ही निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर नगरपरिषदेचे सर्वच आधिकारी कर्मचारी,नगराध्यक्षा आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या काम करत आहे. पालिकेचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन शहर स्वच्छ करत आहे.एकीकडे हे होत असताना विरोधक मात्र निवेदन देणे,फोटो सेशन करणे यात धन्यता मानत आहेत.परंतु श्रीरामपूरची जनता सुज्ञ असून अडचणीच्या काळात मदत करत आहे. व कोण राजकारण करत आहे हे जाणून आहे. परंतु या सगळ्याकडे दुर्लक्ष करत जनसेवा हिच ईश्वर सेवा याप्रमाणे नगराध्यक्षा आदिक कार्यरत आहेत.

आ. लहु कानडे यांच्या प्रयत्नातून साकार झालेले 500 बेडच्या कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह या सर्वच ठिकाणी पालिकेच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. पालिकेची अ‍ॅम्बुलन्स ,पिण्याचे पाणी, दैनंदिन साफसफाई या कामात पालिकेचे कर्मचारी योगदान देत आहेत. यावर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे टीकाकारांनी आता तरी सत्य परिस्थिती स्विकारली पाहिजे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com