श्रीरामपुरात कांदा 1100 तर गहू 2450

सोयाबीन 6750 तर लिंबू 100 रुपये किलो
श्रीरामपुरात कांदा 1100 तर गहू 2450

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कृषि उत्पन्न बाजार समितीत कांदा 1100 रुपये, गहू 2450 रुपये, सोयाबीन 6750 रुपये क्विंटल तर लिंबू 100 रुपये किलो दर असा भाव मिळाला आहे.

उन्हाळी कांद्याची 4736.47 क्विंटल आवक झाली. कांद्याचे बाजारभाव नंबर 1 कांदा 800 ते 1100 रुपये क्विटल, नंबर 2 कांदा 500 ते 750 व नंबर 3 कांदा 200 ते 450 क्विंटल तसेच गोल्टी कांदा 450 ते 800 रुपये बाजारभाव निघालेले आहेत.

भुसार मार्केटमध्ये गव्हाची 33 क्विटल आवक झाली असून बाजारभाव 1900 ते 2450 रुपये व सरासरी 2100 रुपये निघाले आहे. हरभरर्‍याची 23 क्विंटल आवक झाली असून 4100 ते 4300 रुपये व सरासरी 4200 भाव निघाले आहेत. सोयाबीनची 22 क्विंटल आवक झाली असून 6000 ते 6750 रुपये. बटाट्याची 247 क्विंटल आवक झाली असून 18 ते 20 रुपये किलो व सरासरी 19 रुपये किलो या दराने बाजारभाव निघाले आहेत. हिरवी मिरची या शेतमालाचे 25 क्विंटल आवक झाली असून 30 ते 40 रुपये किलो व सरासरी 35 रुपये किलो या दराने भाव निघाले आहेत.

वांग्याची 10 क्विंटल आवक झाली असून 10 ते 20 रुपये किलो व सरासरी 15.50 रुपये किलो या दराने भाव निघाले आहेत. लिंबूची 8 क्विंटल आवक झाली असून 60 ते 100 रुपये किलो व सरासरी 75 रुपये किलो या दराने भाव निघाले आहेत. उन्हाळयामुळे लिंबाला जास्त मागणी असल्याने बाजारभाव वाढले आहेत.

टरबुजची 40 क्विंटल आवक झाली असून 4 ते 7 रुपये किलो व सरासरी 5.50 रुपये किलो या दराने निघाले आहेत. खरबुज या शेतमालाचे 24 क्विंटल आवक झाली असून 5 ते 10 रुपये किलो व सरासरी 7.50 रुपये किलो या दराने भाव निघाले आहेत.

आंब्याची 23 क्विंटल आवक झाली असून 70 ते 120 रुपये किलो व सरासरी 95 रुपये किलो या दराने भाव निघाले आहेत.

Related Stories

No stories found.