श्रीरामपुरात कांदा 1200 रुपये

श्रीरामपुरात कांदा 1200 रुपये

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व भुसार मार्केटमध्ये कांद्याला 900 ते 1200 रुपये क्विंटल तर सोयाबीनला .5200 रुपये क्विंटल असे बाजारभाव निघाले. सोयाबीनचे भाव कमी झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये 127 वाहनातून 2072-40 क्विंटल कांदयाची आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 650 ते 850 व नंबर 3 कांदा 250 ते 600 तसेच गोल्टी कांदा 750 ते 1000 रुपये क्विंटल असे भाव निघाले. भुसार मार्केटमध्ये 26 क्विंटल आवक झाली.

ज्वारीची 3 क्विंटल आवक होऊन 2600 रुपये क्विंटल, हरबर्‍याची 10 क्विंटल आवक होऊन 3900 ते 4000 व सरासरी 3950 रुपये क्विंटल असे भाव निघाले. सोयाबीनची 12 क्विंटल आवक झाली असून 4000 ते 5200 व सरासरी 5000 रुपये क्विंटल तर मुगाची 1 क्विंटल आवक झाली असून 5701 भाव निघाले असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव किशोर काळे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com