श्रीरामपूर शहरातील ओमिक्रॉनबाधित महिला उपचारानंतर होम क्वॉरंटाईन

श्रीरामपूर शहरातील ओमिक्रॉनबाधित महिला उपचारानंतर होम क्वॉरंटाईन
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नायजेरिया येथून श्रीरामपूर शहरात आलल्या महिलेचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर महिलेचा करोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर तिच्यासह मुलाला काल घरी सोडण्यात आलेे.

उपचारादरम्यान रविवारी त्यांची पुन्हा ओमिक्रॉनची तपासणी केली असता महिलेसह सहा वर्षीय मुलाचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले. या महिलेने करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांनीही करोना लसीकरण केले होते. त्यामुळे उपचार घेऊन त्या लवकर बर्‍या झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वॉरंटाईन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) येथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षांचा मुलगा 15 डिसेंबर रोजी श्रीरामपुरात आले होते. त्यानंतर 18 डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने त्यांची करोना तपासणी केली. त्यात महिला व मुलगा करोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या स्रावाचे नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत ओमिक्रॉन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे 55 नागरिकांचा शोध घेऊन सर्वांची करोना तपासणी केली. सुदैवाने त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. परंतु महिलेचा ओमिक्रॉनचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यातील ती ओमिक्रॉनची पहिली रुग्ण ठरली होती. यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com